विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पटकावलं रौप्य पदक

विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं केरळमध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे. यामुळं सुष्मिताची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा झेंडा डौलानं फडकत आहे. आता पॉवरलिफ्टींगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटाव्यातील सुष्मिता देशमुख राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत आहे. १९ जूनला केरळ येथे झालेल्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात सुष्मितानं रौप्य पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading