यंदा गतवर्षीच्या तुलनेत बराच कमी पाऊस

यंदा पाऊस चांगलाच लांबला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा फारच कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये साधारणत: २८८ मिलीमीटर पाऊस होतो. गेल्यावर्षी याच काळात जूनमध्ये २१२ मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षीही पाऊस काहीसा लांबला होता. तरीसुध्दा पावसानं चांगली हजेरी लावली होती. पण यंदा मात्र पावसानं चांगलीच दांडी मारली आहे. या जून महिन्यात आत्तापर्यंत फक्त ८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पाऊस खूपच कमी झाला असला तरी या पावसामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. या पावसामुळं मे महिन्यातील अंगाची लाही लाही करणा-या तीव्र उष्म्यापासून सुटका झाली आहे. मे महिन्यात ४५ सेल्सियस पर्यंत गेलेला पारा आता ३२ सेल्सियस पर्यंत खाली आला आहे. त्यामुळं वातावरणात काहीसा आल्हाददायकपणा जाणवत आहे. पण पाऊस लांबल्यामुळे पाण्याच्या टंचाईची भीतीही वाढली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading