वाहतुकीस अडथळा ठरणा-या बेवारस वाहनांवर महापालिकेकडून लवकरच कारवाई

रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणा-या आणि नो पार्कींगमध्ये अनेक दिवसापासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्या वतीनं धडक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई करताना नोटीस देऊन वाहनं हटवण्याची मुभा दिली जाणार असून नोटीसीचा कालावधी संपताच वाहनं हटवून कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील रस्ते, पूल, उड्डाणपूल येथे अनधिकृतपणे सोडून दिलेल्या बेवारस वाहनांमुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तसंच कार्यक्षेत्रातील स्वच्छता, सुरक्षितता आणि अपघात यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानं अशा वाहनांवर ठोस आणि कालमर्यादेत कारवाई करण्यासाठी शासनानं सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगानं बेवारस वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading