वागळे प्रभाग समितीमध्ये विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण तसेच रँडम टेस्टींग करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

वागळे प्रभाग समितीमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी विशेष पथकाद्वारे सर्वेक्षण तसेच रँडम टेस्टींग करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. वागळे प्रभाग समितीमधील झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाधित परिसराचे तातडीने सर्वेक्षण तसंच रँडम टेस्टींग करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून 5 विविध पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे. पालिका आयुक्तांनी काल वागळे प्रभाग समितीमधील अनेक ठिकाणी पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहेत. त्यानुसार वागळे प्रभाग समिती परिसरात सी. पी. तलाव, भटवाडी, किसननगर, पडवळनगर परिसरात विशेष पथकांच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाधित रूग्ण सापडले आहेत त्या परिसरातील नागरिकांच्या रँडम पद्धतीने कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading