ठाणे शहराचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी ६ तास बंद

ठाणे शहराचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी ६ तास बंद राहणार आहे. टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर मधून गळती होत असल्याने ट्रान्सफॉर्मरची अत्यंत तातडीने दुरुस्ती करण्‍याचे काम शुक्रवारी १ मे रोजी करण्‍यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, सिध्देश्‍वर, जॉन्सन, इटर्निटी, इंदिरानगर, समतानगर, लोकमान्यनगर, किसननगर आणि श्रीनगर या विभागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading