केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच होणार १ मे चं ध्वजारोहण

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हयामध्ये केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच १ मे ला ध्वजारोहण होणार आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त १ मे रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी केवळ निमंत्रित अधिकारीच उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील इतर शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था अथवा खाजगी आस्थापना यांनी ध्वजारोहण सोहळा आयोजित करु नये असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading