वागळे इस्टेटमध्ये एका व्यक्तीकडून ४ तलवारी आणि ४ चॉपर अशी हत्यारं जप्त

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना ठाण्यात वागळे इस्टेटमध्ये एका व्यक्तीकडून ४ तलवारी आणि ४ चॉपर अशी हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. श्रीनगर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार किसननगरमधील इंदिरा सदन येथे घरझडती घेतल्यावर पियुष देवनाथ आणि सुजित पाठक या दोघांनी घरामध्ये ४ तलवारी आणि ४ चॉपर अशी घातक हत्यारं लपवून ठेवल्याचं आढळून आलं. पोलीसांनी याप्रकरणी पियुषला अटक केली असून सुजित तिरूपतीला गेल्यानं तो मिळू शकला नाही. पोलीसांनी दोघांविरूध्द घातक शस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading