भिवंडीमध्ये १० लाखांची रोकड भरारी पथकानं केली जप्त

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता पथकानं केलेल्या धडक कारवाईत १० लाखांची रोकड हस्तगत केली आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर झाली असून सर्वत्र वाहनांची तपासणी केली जात आहे. भिवंडीमध्येही अशीच तपासणी सुरू होती. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळवदकर यांनी आचारसंहिता पथक, विशेष भरारी पथक, वाहन तपास पथक स्थापन केली आहेत. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास चाविंद्रा तपास नाका येथे शहरात येणा-या वाहनांची तपासणी सुरू असताना ह्युंदाई आयटेन या वाहनाची तपासणी केली जात होती. त्यावेळी या गाडीत १० लाख रूपयांची अवैध रोकड आढळून आली. याबाबत वाहन चालक सुरेश धर्माणी यांना योग्य उत्तर देता आलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नळवदकर यांनी ही रक्कम भिवंडी कोषागारात जमा केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading