वर्तकनगर येथील सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन

ठाण्याच्या वर्तक नगर येथील अल्प उत्पन्न गटातील 67 सदनिका टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनसाठी राखीव ठेवण्याकरता सकारात्मक विचार करून नियमानुसार सदनिका वितरित केल्या जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या धोरणानुसार टीव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या ज्या सभासदांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि ज्या सभासदांचे ठाणे महापालिका हद्दीत स्वतःचे घर नाही अशा सभासदांकरता म्हाडाने त्वरित सोडत काढण्याची कार्यवाही करावी आणि त्यांना घराचा ताबा द्यावा असे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading