डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झालाच पाहिजे – महापालिका आयुक्तांचे आदेश

डेंग्यूचा प्रत्येक संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झालाच पाहिजे असे आदेश महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कुणाचं मॅपिंग करावं कोणत्या भागात प्रादुर्भाव आहे हे यामुळे कळू शकेल. त्यानुसार डासांची उत्पत्ती शोधून ती नष्ट करता येऊ शकते. नियमित औषध फवारणी करावी तसेच घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम हाती घ्यावी. रुग्णाला प्लेटलेट्स रक्ताचाचण्या करण्यासाठी हॉस्पिटल बाहेर पाठवू नये अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत आणि मलेरिया या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे महापालिका क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे संशयित आणि निश्चित निदान केलेले पाच रुग्ण तर मलेरियाचे 88 रुग्ण आढळले होते तर डेंग्यूचा आणि मलेरियाचा प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे निश्चित निदान केलेले पाच रुग्ण आणि मलेरियाचे 59 रुग्ण आढळले आहेत. शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढू नये यासाठी संशयित रुग्णांची तपासणी तसेच नियमित औषध फवारणी करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये 18 हजार 339 ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. शहरांमध्ये 48 हजार 720 घरांची तपासणी झाली असून त्यापैकी 2944 घरं दूषित आढळली आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading