दाराची कडी काढता न आल्यानं अडकलेल्या चिमुकल्याची सुटका

आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं दाराची कडी काढता न आल्यानं अडकलेल्या एका चिमुकल्याची सुटका केली आहे. काल संध्याकाळी दिवा-शीळ येथील आशापुरा सिंफनी येथे हा प्रकार घडला. ४ वर्षाच्या अथर्व तळेकर यानं स्वत:हून दाराची कडी लावली. मात्र त्याला नंतर ती काढता न आल्यानं तो सातव्या मजल्यावर अडकून पडला. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं या इमारतीकडे धाव घेतली आणि बेडरूमचा दरवाजा तोडून त्याची सुटका करत त्याला आई-वडीलांच्या ताब्यात दिलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading