वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करावं अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या जागेवर अनधिकृतरित्या ख्रिश्चन धर्मीय मृत व्यक्तीचे दफन करण्याचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर डावखरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली. अनधिकृतरित्या दफन केलेल्या मृत व्यक्तीचा मृतदेह तिथून काढून योग्य जागी विधीवत दफन करावा, विना परवानगी दफन विधी करणा-यांवर कारवाई करावी, या भागातील पुरातन जानकादेवी मंदिराबरोबरच हिंदू धर्मीयांच्या लोकवस्तीचा विचार करून ख्रिश्चन अथवा अन्य धर्माच्या स्मशानभूमीला परवानगी देऊ नये, महापालिकेच्या मालकीच्या आणि खेळाच्या मैदानासाठी राखीव भूखंडाला सीमांकन करून भूखंड मैदानासाठी द्यावा अशा मागण्या शिष्टमंडळानं केल्या आहेत. तसंच सरकारी यंत्रणांनी या जागेचा ताबा घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्तांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूच्या भूमिका ऐकून घेतल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading