लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना संवाद कौशल्य आणि दैनंदिन घडामोडींचे मूल्यमापन करणे आवश्यक – महापालिका आयुक्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्याला सामोरे जाताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, कोणत्याही क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करायचे असेल तर ध्येयनिश्चिती त्या अनुषंगाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, आलेल्या ताण-तणावाचे व्यवस्थापन आणि दैनंदिन घडामोडींचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संवाद आणि मार्गदर्शन या व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना केले.
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील “पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्ग 2022-23” आणि “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग 2022-23” मधील प्रशिक्षणार्थीं करीता महापालिका आयुक्तांचे संवाद आणि मार्गदर्शन हे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आणि प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा चॉईस फार महत्वाचा आहे. आपल्याला आपले आयुष्य सुखी, आनंदी, समाधानी आणि समृद्ध करण्याकरीता एखादी गोष्ट आपण का करतोय ? का करावी ? या करीता तुमचा चॉईस हा घटक महत्वाची भुमिका पार पाडतो. प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन आणि रोल कसा असावा ? लोकांप्रती, समाजाप्रती कोणती भावना असावी ? गोर-गरीब किंवा आपल्याकडे कामाकरीता आलेल्या नागरीकांची प्रामाणिकपणे कामे केल्यानंतर मिळणारे आशीर्वाद आणि समाधान किती महत्वाचे आहे ? याबाबत महापालिका आयुक्तांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला विद्यार्थी आणि पालकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच प्रश्न- उत्तरांच्या माध्यमातुन व्याख्यानाला आलेल्या प्रशिक्षणार्थींशी हसत-खेळत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुसंवाद साधुन प्रशिक्षणार्थींच्या मनातले अनेक समज- गैरसमज दुर करून आयुक्तांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना UPSC आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरीता आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता होणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीं विशाल हरमलकर यांनी UPSC-EPFO या परीक्षेत ALL INDIA RANK-48 वा क्रमांक मिळविल्याबद्दल आयुक्त विपिन शर्मा यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading