ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यातील वास्तू रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देणार

ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यातील वास्तू विविध संस्थांना समाज उपयोगी कामांसाठी दिल्या जातात. या वास्तू आता स्वारस्य अभिव्यक्ती सूचना काढून रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आजवर नाममात्र भाडे दराने देण्यात आलेल्या वास्तू ताब्यात घेण्याची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्‌त महेश आहेर यांचे मार्फत करण्यात आली. त्यानुसार सिध्देश्वर तलाव परिसरातील निसर्ग संस्कार भवन ही तळ अधिक एक १ मजली वास्तू, स्थावर मालमत्ता विभागाच्या ताब्यात असलेली इमारत चैत्रगौरी महिला मंडळ यांना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक रुपया नाममात्र या दराने तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही वास्तू रेडी-रेकनर दराने भाडेतत्वावर देण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाने चैत्रगौरी महिला मंडळ यांच्याकडून ताब्यात घेण्यात आली. तसेच कोलबाड येथील तळ अधिक एक मजली वास्तू नागेश्वर हेल्थ ॲण्ड स्पोटस् क्लब यांना भाडे कराराने देण्यात आली होती. भाडे कराराची मुदत संपल्यामुळे ही वास्तू देखील स्थावर मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली आहे. सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत येथील आमदार- खासदार निधीतून बांधण्यात आलेली व्यायाम शाळा ही सावरकरनगर रहिवाशी संघ यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कराराची मुदत संपली असून २१ हजार रूपये भाडे थकलेले आहे. तसेच या वास्तूच्या उर्वरीत जागेत अनधिकृत बांधकाम केल्यामुळे स्थावर मालमत्ता विभाग आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती यांनी संयुक्तपणे ही वास्तू ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी राजू शिरोडकर यांचेवर एम.आर.टी.पी. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार – खासदार निधीतून बांधण्यात आलेले समाज मंदिर, व्यायामशाळा या वास्तू भाडेतत्वावर विविध संस्थांना दिल्या असून त्यांची मुदत संपलेली आहे. यासाठी नव्याने भाडे करार करण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाकडून EOI काढण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.
वाघबीळ येथील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महेंद्र पाटील यांचेवर एम.आर.टी.पी. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत वाणिज्य गाळयांच्या मागील मोकळया जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्रकाश पायरे यांचेवर एमआरटीपी कायद्यांतर्गत नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading