जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जैन प्रकोष्ठ परिवारातील सदस्य आणि रिध्दी सिध्दी मेडीकलच्या जीतु जैन यांच्या बहिणीचा परिवार आणि ठाणे जैन समाजातील अमित परमार अशा एकूण ५ सदस्यांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू झाला आहे. पोस्टमार्टम साठी सर्वांचे पार्थिव पाठवण्यात आले असून लवकरच त्यांच्या परिवाराकडे सुपुर्द करण्यात येतील असं सांगण्यात आलं.