लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करत बदनामी करणा-यास अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करत तिचे नग्नावस्थेतील फोटो त्या तरूणीच्या नकळत इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करणा-या गुरूचरण सहाला नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे. ही तरूणी स्पीकवेल क्लासमध्ये शिकत असताना गुरूचरणनंही तिथे प्रवेश घेऊन तिचा विश्वास संपादन करत तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि ५ एप्रिलला तलावपाळी येथील किनारा लॉजमध्ये नेऊन तिच्या संमतीशिवाय तिच्याबरोबर संबंध केले. याचवेळी तिचे फोटो नकळत काढून तिचा भाऊ आणि मित्राच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आणि तिची बदनामी केली. हा प्रकार कळल्यावर या तरूणीनं नौपाडा पोलीसांकडे तक्रार दाखल केली. नौपाडा पोलीसांनी गुरूचरण सहाला या प्रकरणी अटक केली आहे. त्याने अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्याची कबुलीही पोलीसांना दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading