मतदार जागृतीसाठी रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेत ठाणेकर उत्साहानं सहभागी

मतदार जागृतीसाठी रन फॉर व्होट मॅरेथॉन स्पर्धेत ठाणेकर उत्साहानं सहभागी झाले होते. जिल्हाधिका-यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरूवात झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावं यासाठी मतदान जनजागृती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. १०, ५ आणि ३ अशा तीन गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत ५ वर्षापासून ८० वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार राजेंद्र चव्हाण अशा अधिका-यांनी ५ किलोमीटरची मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. विजया भट, श्रध्दा ननावरे, नंदा शेट्टी, गुरूमूर्ती नायक, प्रशांत सारंग या स्पर्धकांसह राज्याच्या विविध भागातील अनेक नामवंत खेळाडू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading