खाजगी वित्त कंपनीच्या वसुली अधिका-यानं लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचं उघड

खाजगी वित्त कंपनीच्या वसुली अधिका-यानं कर्जदाराकडून वसूल केलेल्या लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचं उघडकीस आलं आहे. मॅग्ना फिनकॉर्प या खाजगी वित्त कंपनीचे माजिवडा येथे कार्यालय आहे. या कार्यालयात निशिकांत बनसोडे हे वसुली अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या हाताखाली ५ कर्मचारी कर्ज वसुलीसाठी नेमण्यात आले आहेत. डोंबिवलीतील रविंद्र राय यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते बनसोडे हे आपल्या कर्मचा-यांकडून वसूल करत होते. पण कंपनीच्या खात्यात जमा न करता आपल्या आणि पत्नीच्या खात्यात जमा करत असत. वेळेवर हफ्ते भरूनही कर्जाची रक्कम कमी न झाल्यानं कर्जदार राय यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत तब्बल ७ लाखाहून अधिक रक्कमेचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading