रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची मागणी

रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. गेले दोन दिवस रोशनी शिंदे या महिलेवरून ठाण्यात राजकारण सुरू आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम ठाकरे गट तसंच महाविकास आघाडीकडून होत असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी यावेळी केला. रोशनी शिंदे यांना सिव्हील हॉस्पीटलमधून संपदा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी रोशनी शिंदे या गर्भवती नसून त्यांना कुठेही मारहाण झालेली नसल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडून आता या महिलेला लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे राजकारणासाठी या महिलेचा वापर हा गट करत असून या महिलेच्या जीवाला धोका असल्याचं वाटत आहे. त्यामुळे पोलीसांनी या महिलेला संरक्षण देऊन तिच्या जिवाची काळजी घ्यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading