सुपरमॅक्स ब्लेडचं उत्पादन बंद होत असल्याच्या विरोधात आज कामगारांचा निषेध मोर्चा

सुपरमॅक्स ब्लेडचं उत्पादन बंद होत असल्याच्या विरोधात आज येथील कामगारांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला होता. यावेळी आम्हांला न्याय द्यावा अशी मागणी कामगार करत होते. त्यांच्या हातात जय जवान जय जवान त्याचप्रमाणे जय कामगार असे फलक होते. ठाण्यातील सर्वात जुनी कंपनी म्हणून ओळख असलेली पनामा कंपनीही कंपनी बंद पडण्याच्या मार्गांवर आहे कारण व्यवस्थापनाने तेथील कामगारांना गेले क्रित्येक महिने पगारच दिला नाही वास्तविक पहाता कंपनीचे सुपरमॅक्स ब्लेडचे उत्पादन पाहता ही कंपनी ही तोट्यात जाणं अशक्य होतं. मात्र कंपनीचे व्यवस्थापन कंपनी जाणून बुजून नुकसानीत असल्याचे दाखवत आहे त्याला कारण आहे कंपनीची जागा आज ठाण्याच्या मध्यवर्ती वस्तीत असल्यामुळे या जागेला सोन्याचे भाव आले आहेत त्यामुळे ही कंपनी घेण्याकडे बिल्डर आणि राजकारण्यांचा डोळा आहे आणी त्यामुळेच कामगारांना उपाशी मारण्याचा मालकाचा डाव असल्याचा दावा कामगारांनी केला आहे त्यामुळे आम्हाला लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading