राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली कारण त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले – नाना पटोले

राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली याच कारण म्हणजे त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले आहेत. राहुल गांधी यांनी sbi चे विषय पुढे आणले आहेत सर्व धंदे लोकांचे पैसे अदानी यांच्याकडे पाठवण्याचे काम केले जात आहे. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत केला. सर्व खाजगीकरण करण्याचं काम केलं जात आहे. सर्व काही अदानी यांना देण्यात येत आहे. परदेशात देखील नवीन कंपन्या उभारल्या गेल्या आणि ते पैसे कोणाचे हे विचारल्यावर सुडाच राजकारण केले गेले.
फक्त अहंकार आणि बाकीच्या गोष्टीसाठी ह्या ठिकाणी पुढे आणून ही कारवाई केली. राहुल गांधी यांचं सदस्यपद रद्द केले गेलं आहे
कोर्टाने या सरकारला नपुसंक सरकार ठरवले आहे. हिंदुचे सरकार या राज्यात असताना हिंदू जन आक्रोश कश्यासाठी सुप्रीम कोर्टाने पण या जन आक्रोश थांबवण्यास सांगितले होते. पण गृहमंत्र्यांनी खोटे पुरावे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला दिले आहेत. हे महाराष्ट्र चे दुर्भाग्य आहे आज ठाण्यामध्ये पोलीस देखील सुरक्षित नाहीत. आमचे कार्यकर्ते गिरीश कोळी यांच्यावर हल्ला झाला. ही लोकशाही धोकादायक झाली असल्याचं सांगत सरकारवर कारवाई करण्याची मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.
आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत.तसेच या ठिकाणी सरकार बरखास्तच करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
संभाजी नगर येथे देखील मुद्दामून दंगल घडवून आणण्याचे काम हे सरकार करत आहे.भाजप च्या काळात जातीय दंगली कां होतात हा आमचा प्रश्न आहे. सगळे प्रकरण घडत असताना या ठिकाणी पोलीस का लक्ष घालत नाहीत.
आव्हाड यांच्या बॉडीगार्ड प्रकारणत संशयस्पद मृत्यू आहे. सदा सरवणकर यांनी बंदूकीतून झाडलेली गोळी ही त्यांच्या बंदूकीतून नाही असा मागे रिपोर्ट आलाय म्हणजे या सरकार चा पोलिसांवर दबाव आहे. तसाच पोलिसांकडून जितेंद्र आव्हाड यांना फसवण्याचा प्रकार झाला आहे. सरकारची मनमानी चालवून घेणार नाही असं पटोले यांनी यावेळी सांगितलं. सर्व निर्णय सर्व कायदे धाब्यावर बसवून या ठिकाणी हे काम केलं जात असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांना भेटून मारहाणीबाबत आम्ही तक्रार करणार असून गुन्हा दाखल झाला नाही तर काँग्रेस मोठे आंदोलन करेल असा इशाराही नाना पटोले यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading