कोनगाव येथील क्षितिज ठोंबरे याने कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली

खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा कोनगाव येथील क्षितिज ठोंबरे याने कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत त्यांन कांस्यपदक जिंकले आहे. भिवंडीतील कोनगावचा क्षितिज चेरोबा क्रीडा मंडळातर्फे गेली आठ वर्षे कबड्डी खेळतोय. क्षितिज हा कर्नाटकच्या धारवाड येथील आरएलएस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबदृल कोनगावच्या नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत त्याचं स्वागत केलं. त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्षितिज ठोंबरे याचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading