राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणा-या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिंदे-फडणवीस आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, या प्रसंगी गुजरात सरकारची निर्भत्सना प्रकल्प चोर अशी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्‍या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्यात आला. उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला हे धोरण शिदे-फडणवीस सरकारने आखले असून त्यास मोदींचा पाठिंबा आहे. या पुढे जर असे प्रकल्प पळविले तर या सरकारला जनता पळवून लावेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading