कळव्यात इमारतीचा स्लॅब पडल्याने तीन जण जखमी

कळव्यातील मनिषानगर येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडल्याने तीन जण जखमी झाले आहेत. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास मनिषानगर गेट क्रमांक १ येथील विक्रांत या ३८ वर्ष जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील खोलीचा स्लॅब तळ मजल्यावर पडला. गणेश धामणे यांच्या खोलीचा स्लॅब तळमजल्यावरील ग्लोबल ब्युटी सलूनमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेमध्ये आयुष धामने हा विक्रांत सोसायटीत राहणा-या तरूणाच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तर कादिर सलमानी हा सलूनमध्ये काम करणा-या कर्मचा-याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून पार्थ पाटेकर या सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या मुलाच्या डोळ्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. या तिघांना उपचारासाठी कळव्यातील प्रमिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विक्रांत या इमारतीत तळमजल्यावर ६ दुकानं आणि २ खोल्या आहेत तर पहिल्या, दुस-या आणि तिस-या मजल्यावर प्रत्येकी ६ खोल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील स्लॅब पडलेली खोली बंद करण्यात आली असून संपुर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading