राष्ट्रवादी पक्षाचा जन्मच गद्दारीतून झाला आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी बोलताना केली. काल महाराष्ट्रातील हास्यास्पद दिवस होता. एक म्हण आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून तसं राष्ट्रवादीचं आहे असंही म्हस्के म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष आंदोलन कशावर करतात तर खाके, गद्दारी याच्यावर, ज्याचा जन्मच गद्दारीतून झाला आहे.
शरद पवार यांची जी सुरुवात झाली ती वसंत पाटील ह्या त्यांच्या गुरूंमुळे पण आपल्या गुरूलाच त्यांनी फसवलं. वसंत पाटील यांना पदासाठी त्यांनी फसवलं हा संपूर्ण इतिहास जगाला माहित आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.