राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत राज्य शासनाचा निषेध केला. राज्यातील सरकारने वेदांत ग्रुपचा उद्योग गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप करत जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही जोरदार निदर्शनं केली. महाराष्ट्र आमच्या हक्काचा- नाही कुणाच्या बापाचा, बंद करा गुजरातची गुलामी, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी, गद्दारांना ५० खोके महाराष्ट्राला धोके अशा घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तरूणांना बेरोजगारीच्या खाईत लोटल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी राज्य शासनाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना एक निवेदन दिले.