ठाणे पोलीसांनी केली भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद

ठाणे पोलीसांनी भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद केली आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलीसांनी परवेझ सय्यद आणि त्याचा सहकारी फैय्याज हक अशा दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा वाहनं आणि मोडीत काढलेल्या चार वाहनांचं इंजिन असा २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचं पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सांगितलं. कापुरबावडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल झाला आहे. या चोरीचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी एक पथक निर्माण केलं होतं. या पथकानं विविध ठिकाणी जाऊन मोटार मॅकेनिक, स्थानिक नागरिक, सीसीटीव्ही फूटेज असा तांत्रिक तपास करून कर्नाटकमधून परवेझ सय्यद याला एका कारसह ताब्यात घेतलं. त्याच्या कबुलीनंतर पोलीसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून हे गुन्हे उघडकीस आले. आत्तापर्यंत १२ गुन्हे उघड झाले असून ६ कार आणि भंगारातील ४ वाहनांच्या इंजिनासह सुटे भाग असा २१ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. वाहन मालकांना अधिक भाड्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वाहनं भाडेतत्वावर घेतली जात असत. नंतर त्या लोकांना खोटी कारणं सांगून वाहनांची विक्री केल्याचंही उघड झाल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading