राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य

राष्ट्रवादी काँग्रेसनं पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक्स भरून संसारोपयोगी साहित्य पाठवलं आहे. या ट्रकला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. गेल्या आठवड्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीनं लागणा-या जीवनावश्यक वस्तू पाठवल्या होत्या. मात्र पूरग्रस्तांचे संसार वाहून गेल्यामुळे त्यांचे संसार उभे करण्याचे मोठे आव्हान होते. हे लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना आवश्यक असणा-या गृहोपयोगी वस्तू जमा करण्यात आल्या आणि या वस्तू ट्रकने कोल्हापूरला पाठवण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading