ठाणे महापालिका क्षेत्रात २६ ठिकाणी शांतता क्षेत्र जाहीर

ठाणे महापालिका क्षेत्रात २६ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्राच्या १०० मीटर परिसरात शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. नागरिकांनी या सर्व ठिकाणी ध्वनी पातळीचं पालन करावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालय, एम. एच. हायस्कूल, सेंट जॉन बापटिस्ट हायस्कूल, ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, कामगार रूग्णालय, ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय, बेथनी हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, लिटिल फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल, वसंतविहार इंग्लिश हायस्कूल, सिंघानिया स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, ज्ञानोदय माध्यमिक हिंदी विद्यालय, भारतरत्न इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, वेदांत रूग्णालय, माजिवडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे हायस्कूल, न्यू होरीझोन स्कॉलर स्कूल, सफायर हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, न्यू इंग्लिश स्कूल कळवा, ठाणे महापालिका शाळा क्रमांक ३१, ४० अशा ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. ध्वनी प्रदूषणासंबंधी तक्रार १८०० २२२ १०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ७५०६९४६१५५ या क्रमांकावर व्हॉटस् ॲप करता येईल. मात्र महापालिकेनं तक्रारदारांचं नाव गुप्त ठेवलं जाईल याबाबत भाष्य करणं टाळलं आहे. म्हणजेच या प्रकरणी कोणी तक्रार करण्यास धजावणार नाही अशी काळजी घेतली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading