ठाणे महापालिका क्षेत्रात आज नविन १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात आज नविन १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६ रूग्ण नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील आहेत. तर मुंब्रा ३, उथळसर २, वागळे इस्टेट २ आणि लोकमान्य-सावरकरनगर आणि दिव्यातील प्रत्येकी १ रूग्ण दाखल झाला आहे. आत्तापर्यंत कोरोनाग्रस्त रूग्णांच्या आकडेवारीनुसार माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती १९, वर्तकनगर २३, लोकमान्यनगर-सावरकरनगर ४२, नौपाडा-कोपरी ३३, उथळसर २८, वागळे इस्टेट ३१, कळवा २७, मुंब्रा ४७, तर दिवा प्रभाग समितीत ६ रूग्ण आहेत. त्यामुळे आता ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण रूग्णांची संख्या २५६ झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading