राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टिका करणा-या उपहासात्मक गाण्याची जोरदार चर्चा

ठाण्यातील राजकीय नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड अनेकदा जाताना दिसतात. त्यांचा गळा गाता आहे. त्याचा उपयोग त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केला आहे. आव्हाड यांनी सावन का महीना पवन करे शोर या गाण्या च्या चालीवर राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टिका करणा-या उपहासात्मक गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा या गाण्यातुन निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधानांना लक्ष्य केलं आहे. ‘सावन का महिना पवन करे शोर’ या मिलन चित्रपटातील गाण्याच्या चालीवर ‘चुनाव का महिना’ हे गाणं त्यांनी गायलं आहे. फिल्मी स्टाइलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘सावन का महिना पवन करे शोर’ या मूळ गाण्यातील शब्दांमध्ये त्यांनी थोडा बदल करून ‘चुनाव का महिना’ हे नवीन गाणं तयार केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षावर राफेल मुद्द्यावरुन त्यांनी पहिल्या कडव्यात टीका केली आहे. त्यानंतर मोदी आणि नवाज शरीफ यांच्या भेटीवरुन आव्हाड यांनी दुसऱ्या कडव्यामध्ये मोदींना टोला लगावला आहे. तर शेवटच्या कडव्यामध्ये नोटबंदीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष केलं आहे. आव्हाड यांच हे गाणं त्यांच्याच आवाजात.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading