राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आमदार संजय केळकर यांचा सत्कार

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

ठाणे – महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता
संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या कार्यक्रमात हा आमदार संजय केळकर यांचा सत्कार
करण्यात आला.
आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न विधीमंडळात मांडले तसेच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांच्याकडे पाठपुरावा केला. वेळोवेळी वृत्तपत्र विक्रेत्यांचे विषय शासन दरबारी मांडले त्यामुळे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आमदार संजय
केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी राज्य शासनाने स्थापन केलेल्या वृत्तपत्र विक्रेता असंघटीत कामगार कल्याणकारी
योजना अभ्यास समितीतील हरिश्चंद्र पवार, सुनिल पाटणकर, बालाजी पवार, संजय पावसे, दत्ता घाडगे, रविंद्र कुलकर्णी, राजेंद्र टिकणार या सातही
सदस्यांचा ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आमदार केळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना आमदार संजय
केळकर म्हणाले की राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आणि सल्लागार मंडळ हे झालेच पाहिजे त्यासाठी आपण कायम राज्य
वृत्तपत्र विक्रेता संघटनेसोबत आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानाने जगण्यासाठी कायमस्वरूपी स्टाॅलसुद्धा पाठपुरावा करणार आहे.
या
बैठकीत संघटनेच्या कामाची पुढील दिशा ठरविण्यात आली. यावेळी संघटनात्मक कामांबाबत गांभीर्याने चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या
कार्यक्रमास राज्यातील पदाधिकारी आणि वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading