राज ठाकरे यांची जाहिर सभा ९ ऐवजी १२ एप्रिलला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मूस चौकातील जाहीर सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. परंतु आता ही सभा ९ ऐवजी १२ एप्रिलला होणार आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारकडून केल्या जाणा-या अडवणुकीचा पाढा वाचला. आता येत्या १२ एप्रिलला या सर्वाची उत्तर सभा राज ठाकरे काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तब्बल १० तासानंतर पोलीसांनी मूस चौकात सभा घेण्यास परवानगी दिल्याचं सांगण्यात आलं. मराठीच्या मुद्यासोबतच ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करीत राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडून सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. याला जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर देत आव्हाड यांच्या मुस्लीम प्रेमावर टीका केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading