जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ

जिल्ह्यात कोरोनाचे ३१३ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात १ हजार २२८ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १२२ रूग्ण आढळले. सध्या ४८२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये २५ रूग्ण, सध्या ७९ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५४ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १०० नवे रूग्ण तर ४४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ४१ रूग्ण, सध्या १३९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ४ रूग्ण तर सध्या ११ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ४ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ६ रूग्ण तर ११ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १५ रूग्ण, सध्या ५३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading