ज्युपिटर रूग्णालयात महिलेवर उपचारानंतर तिला स्वत:च्या पायावर चालणे झाले शक्य

जुपिटर रुग्णालयात एका महिलेवर उपचार केल्यानंतर आता तिला स्वतःच्या पायावर चालणे शक्य झाल आहे. भिवंडीत राहणाऱ्या पूजा मसरानी यांचं वजन दीडशे किलो होतं. त्यांच्या या वजनामुळे त्यांना गेलं वर्षभर फारसं चालता येत नव्हतं. काही वेळा वॉकर घेऊन त्या चालत  होत्या. वाढत्या वजनामुळे त्यांच्या शरीरात इतरही आजार उद्भवले होते. झोपताना कुशी बदलणं. जेवण बनवणे अशी काम आहेत त्यांना करण कठीण झालं होतं. अखेर त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टर प्रशांत साळवी यांनी उपचार केले. साळवी यांच्याबरोबरच हृदयरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, पोषण तज्ञ, अस्थिरोग तज्ञ अशा डॉक्टरांचाही सहाय्य लाभलं. त्यानंतर त्यांच्यावर लॅप्रोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रोटॉमी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्यांचे पोस्ट बेरियाटिक पुनर्वसन चालू झाले. आणि शस्त्रक्रियेच्या सहाव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आपण आत्मविश्वास गमावला होता. जगण्याची आशा सोडली होती. मात्र आता आपल्याला पुन्हा जीवदान मिळालं असून येताना रुग्णवाहिकेतन आले पण आता स्वतःच्या पायावर जाणार असल्याचा आपल्याला खूप आनंद होत असल्याचे पूजा मसरानी यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading