राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ठाण्यात झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली. कायदा सुव्यवस्थेला ठिक करण्यासाठी, भय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु आणि सरकारला वठणीवर आणू. या बैठकीत चार-पाच ठराव आम्ही केले आहेत. अदानींचा आणि मोदींचा संबंध काय?  राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तर दिली पाहिजे. राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे. कर्नाटकातलं प्रकरण सुरतमध्ये चालवायचे. जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी बोलत होते. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आम्ही प्रश्न विचारले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. बी – बियाण्याचे भाव अमाप प्रमाणात वाढवले आहे. महाराष्ट्रात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि फक्त ९ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवल आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारनं केल आहे.  देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात.  आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो, यांना धडा शिकवण्याची वेळ आहे असं पटोले यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. ज्वारी कापसाचे भाव पडत आहेत. शेतकऱ्यांना न्याय द्यायची भावना आमची आहे. ओबीसीचा जातिनिहाय जनगणनेचा ठराव आम्ही पारीत केला आहे.  केंद्रात कॉंग्रेस सरकार आल्यानंतर ओबीसीचं मंत्रालय बनवण्याचा विचार आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं. आम्हीही कांग्रेसच्या वतीनं अयोध्यात जाणार आहोत. अयोध्यात जाणं म्हणजे काय पाकिस्तानात जाण्यासारखं नाही आहे.  रामराज्याचा अर्थ सर्व आनंदी मात्र इथे तर सर्व जण दु:खी असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading