रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी

आज रमजान ईद. ४० दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. चंद्रदर्शन काल झाल्यामुळं ईद आज साजरी होत आहे. आज सकाळी विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला. भिवंडीतील क्वॉटन गेट, चांदतारा, पटेल, जामा मस्जिद, ठाण्यात महागिरीतील जुम्मा मस्जिद, राबोडीतील नूर मस्जिद, जुम्मा मस्जिद, कळव्यातील जुला मस्जिद, मुंब्र्यातील दारूल फलाई तर कासारवडवलीतील जामा मस्जिद अशा विविध मशिदींमध्ये आज सकाळी नमाज अदा करण्यात आला. या परिसरात नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. सर्व रस्ते गजबजून गेले होते. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा, शेवया अशा विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. यावेळी छोट्यांनीही मोठ्यांकडून ईदी उकळल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नमाजाच्या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading