येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला अटक

येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे. येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या शिकार होत असल्याचा संशय वन अधिका-यांना होता. येऊर परिक्षेत्र हे राष्ट्रीय उद्यान असल्यामुळं वन्य प्राण्यांच्या संशोधनासाठी वन परिक्षेत्रात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. अशाच एका कॅमे-यामध्ये तीन शिकारी बंदूक, कु-हाडीसह वनक्षेत्रामध्ये शिरताना चित्रीत झाले होते. त्यांची छायाचित्रं डीव्हीआर मध्ये संग्रहीत झाली होती. त्याप्रमाणे त्यांचा तपास सुरू होता. पण याची कुणकुण शिका-यांना लागल्यानं या शिका-यांनी कॅमेराच चोरून नेला होता. वर्तकनगर पोलीसांनी याप्रकरणी डीव्हीआर मधील चित्रीकरणावरून शिका-यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये येऊरमधील वणीचा पाडा येथे राहणारा सुशांत भोवर हा आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. त्याला पकडण्यात आलं. त्याच्याकडून एअरगन, कु-हाड आणि कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. एअरगननं वन्य पक्ष्यांची शिकार केल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी आणखी २ जण असून त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading