कोरस रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रिया विभागाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

लोकमान्य नगर येथील कोरस रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग हा अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज केला असून या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी आता शस्त्रक्रिया होणार असून याचा फायदा निश्चितच लोकमान्यनगर, वर्तकनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितलं. हा परिसर बहुतांश कामगार वस्तीचा परिसर आहे. या विभागातील गोरगरीब नागरिक हे उपचारांसाठी महापालिकेच्या दवाखान्यांवर अवलंबून असतात. लोकमान्यनगर येथील कोरस रुग्णालयात रुग्णांवर नियमित उपचार केले जातात. या ठिकाणी ऑपरेशन थिएटर होते, परंतु अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे नवीन ऑपरेशन थिएटर आता सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. कोविड काळापासून आरोग्य यंत्रणेला खूप महत्व आले असून सरकारी रुग्णालये ही सुसज्ज असावीत, गोरगरीब नागरिकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ठाणे महापालिका पावले उचलत आहे. आज कोरस रुग्णालयाचे अद्ययावत असे ऑपरेशन थिएटर सज्ज झाले आहे. तसेच या ठिकाणी न्यूरो विभाग सुरू करण्याबाबत विचार असून त्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असेही महापौरांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading