यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनीही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी करू नये श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता ४ फूट आणि घरगुती गणपती करिता २ फूटांच्या मर्यादेत ठेवावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडुची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम स्थळी विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम , शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. शासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमीत्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आल्या आहेत. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading