संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण ताकदीनिशी आणि सर्व सुविधांनी सज्ज झाली असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी दिली. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र ऑक्स‍िजन आणि रेमिडिसीवीर इंजेक्शनचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये अत्यावश्यक सेवा कमी पडू नये यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. या बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा ऑक्स‍िजनची व्यवस्था केली आहे, तसेच व्होल्टास येथे सुध्दा ऑक्स‍िजन उपलब्ध केला जाणार असल्याचे सांगितले. तर तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने लहान मुलांसाठी पार्किंग प्लाझा येथे 100 बेडची व्यवस्था केली असून 50 बेड ऑक्सिजन आणि 50 बेड आयसीयू तसंच 25 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांबरोबर आईला राहणे देखील आवश्यक असल्याने त्याबाबतही व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी लागणारी औषधे आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच कंट्रोल रुम देखील सर्व सुविधांनी सक्षम केला असून एकाच नंबरवर एकावेळी 20 फोनकॉल्स स्व‍िकारले जातील अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण जरी सध्या कमी प्रमाणात आढळत असले तरी सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी कमी करणे, सोशल डिस्टन्सींग, मास्क लावणे अत्यावश्यक असून त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, तसेच यासाठी पोलीस विभागाची मदत घ्यावी असे महापौरांनी सांगितलं. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेची आरोग्ययंत्रणा सर्व सुविधांनी सज्ज आहे, तसेच जर रुग्णांची संख्या वाढल्यास खाजगी कोविड रुग्णालयातील 80 टक्के बेड महापालिकेच्या ताब्यात घेवून योग्य नियोजन करणेबाबतच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनाला दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading