मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल

मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल करण्यात आला आहे.
कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाण्याकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत तसंच सुनिश्चित होण्याकरीता ठाणे शहर वाहतूक विभागाने 10 ऑगस्टपर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल केले असल्याचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading