मेट्रोचे डबे या आठवड्यापासून मिळणार – डब्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा

मुंबईतील मेट्रो रेल्वेसाठी अत्याधुनिक कोच तयार केले जात असून या कोचेसची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. या आठवड्यात यापैकी पहिला कोच दाखल होणार आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत बंगळूर येथील भेल या कंपनीत हे कोच तयार केले जात आहेत. राज्य शासनानं एकूण ५७६ कोचेसची मागणी नोंदवली आहे. २३ जानेवारीला यापैकी पहिला कोच दाखल होणार आहे. या कोचेसची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेल कंपनीत जाऊन पाहणी केली आणि कंपनीचं कौतुक केलं. हे कोच अत्याधुनिक पध्दतीनं तयार केले जात आहेत. सुरूवातीस मेट्रोला चालक असणार असला तरी नंतर मेट्रो विना चालक म्हणजे स्वयंचलित पध्दतीनं चालणार आहे. मेट्रोच्या या कोचेसमध्ये सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. संपूर्ण वातानुकुलित, स्वयंचलित दरवाजे, आपत्कालीन संपर्क यंत्रणा या कोचेसमध्ये देण्यात आली असून या कोचेसमध्ये सायकल ठेवण्यासही जागा देण्यात आली आहे. एका मेट्रोला ६ डबे लागणार असून या ६ डब्यांची क्षमता २२०० प्रवाशांची आहे. साधारणत: मे पर्यंत सर्व डबे मिळणार असून मुंबईतील मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होऊन प्रवाशांनाही आरामदायी सेवा मिळू शकेल असा दावा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या पाहणीनंतर बोलताना केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading