मॅरेथॉन मार्गावर खड्डे नसल्याचा दावा महापौर मिनाक्षी शिंदे यांचा दावा

30 व्या ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉनच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत मॉरेथॉनसाठी निश्चित केलेल्या स्पर्धा मार्गाचा पाहणी केली. रविवार 18 ऑगस्ट ला ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ऑथलेटिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 30 वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन होणार आहे. या स्पर्धेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्पर्धा मार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत हा पाहणी दौरा केला. या पाहणीदौऱया दरम्यान 21 कि.मी स्पर्धा मार्गाची पाहणी करण्यात आली.या पाहणी मध्ये मॅरेथॉन मार्गावर खड्डे नसल्याचा दावा महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला. असे असले तरी मॅरेथॉन मार्गावरील काही भागांमध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामध्ये इंदिरानगर, कामगार चौक, कोरस रस्ता, देवदया नगर या भागांचा समावेश आहे.काही किरकोळ कामे करणे आवश्यक असून आवश्यक ती कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना यावेळी देण्यात आल्या. स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभी असलेली वाहने हटविण्याबाबत संबंधित विभागाना सूचना देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading