दिवा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाने जीवन अमूल्य आहे पादचारी पूल वापरा जिव धोक्यात घालू नका अस उद्दिष्ट समोर ठेवत दिवा RPFआणि GRP यांनी रेल्वे फाटकातून प्रवास करू नका तर पादचारी पूल वापरा ही मोहीम हाती घेऊन प्रवाशांना शालेय विद्यार्थी आणि रेल्वे अधिकारी यांनी गुलाब पुष्प देऊन पादचारी पूल वापरा हा संदेश दिला. या वेळी पादचारी पुलावर मोठी गर्दी झाल्याने रेल्वे प्रशासनाला मोठी कसोटी करावी लागली.गेल्या महिनाभरात 7 जण दिवा रेल्वे स्टेशन वर आपघातात म्रूत्यूमुखी पडले असताना आपघात होऊन जिव जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे.