गौण खनिजासाठी बनावट परवाने बनविणारी टोळी अटकेत

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्यांसह गौण खनिजांसाठी लागणारे बनावट परवाने बनविणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 156 बनावट परवान्यांच्या दोन पुस्तिका जप्त केल्या आहेत. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.ठाण्यात खाडीतून तसेच इतर ठिकाणाहून रेती आणि तत्सम गौण खनिज उपसा करण्यासाठी जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.त्यानुसार गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. कळवा मुंब्रा परिसरात खाडीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपसा केला जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात खनिज परवान्यांची मागणी आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांपासून कळवा येथे बनावट परवाने विक्री होत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने 11 जुलै रोजी सापळा लावून विक्की माळी, अब्दुल खान या दोघांना अटक केली. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत अशा प्रकारचे गौण खनिज उत्खननाचे बनावट परवाने बनवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी पद्माकर राणे,शाजी पून्नन, अरविंद पेवेकर, प्रशांत म्हात्रे, धनसुख सुतार, उमेश यादव,राजू पवार, रवी जैस्वाल या टोळीस अटक केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading