मुरबाड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केला आहे. काल झालेल्या एका मेळाव्यात मुरबाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीत फक्त गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अलिकडेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं शिवसेनेची बाजू मजबूत झाली आहे. जिल्ह्यानं शिवसेना प्रमुखांना नेहमीच साथ दिली असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेला चांगलं यश मिळालं असं यावेळी सांगण्यात आलं.