मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून मुख्यमंत्री सतत दौरे करत आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी पायाला भिंगरी लावून घेतली असून राज्यातील अनेक भागात त्यांनी भेटी दिल्या आहेत. राज्याच्या काही भागाला पूराचा फटका बसला होता त्यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी त्या भागाचे दौरे केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समर्थक आमदारांच्या भागातही त्यांनी दौरे केले होते. या सततच्या दौ-यामुळे मुख्यमंत्र्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading