गावदेवी भूमिगत पार्किंग लवकरच ठाणेकरांच्या सेवेत

ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात येत असलेली गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था आता पूर्णत्वाकडे येत असून लवकरच ही सुविधा ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. पार्किंग सुविधा, लिफ्ट सुविधा आदींची पाहणी ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी नुकतीच केली. तेथील लिफ्ट सुविधेची चाचणी माळवी यांनी त्यांच्या वाहनासह घेतली. गावदेवी भूमिगत पार्किंग येथे १३० चारचाकी आणि १३० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे. सध्या मैदान पूर्ववत करण्यात येत असून ते काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल. अग्निशमन यंत्रणा, रंगरंगोटी ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत तसेच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिफ्ट संबंधित तपासणी परवानगी तसेच उर्वरित कामे पुढील १५ दिवसात पूर्ण करावीत असेही संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading