मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या ३० जुलैला ठाण्यात नागरी सत्कार

ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या रूपात मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे मुख्यमंत्र्यांचा नागरी जनसत्कार ३० जुलै रोजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यावरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे. एका पत्रकार परिषदेत ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’कडून ही माहिती देण्यात आली. आधी शिवसेनेचे कार्यकर्ते, शाखाप्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार ते मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला ऐतिहासिक बहुमान मिळवून दिला आहे. याबद्दल ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील तब्बल 165 संस्थांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी जनसत्कार करण्यात येणार आहे. सत्कारापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आल्याचं जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. या मिरवणुकीत 75 रिक्षा, 75 मोटारसायकल, 75 सायकल आणि ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading